जायकवाडीचे पाणी पोहोचले नक्षत्रवाडीत... नवीन पाणी योजनेचे फटाक्यांनी स्वागत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी मंगळवारी (दि.१४) दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाले. जायकवाडी धरणातून आलेल्या या गोदावरी नदीच्या पाण्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे यांनी जलपूजन केले. शहरात दाखल झालेले पाणी शुद्धीकरणासह अन्य तांत्रिक नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात मंगळवारी पाणी दाखल झाल्यावर पालिकेचे आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे आदींनी जलपूजन केले. प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महिनाभर लागेल. छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २००६पासून विविध प्रयोग आणि प्रयत्न करण्यात आले. २००६ मध्ये शहरासाठी समांतर जलवाहिनीची योजना आखली. मात्र, ही जाचक योजना २०१६मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. जीव्हीपीआर इंजिनीअर्स कंपनीची निविदा पात्र ठरल्यावर फेब्रुवारी २०२१ मध्ये वर्कऑर्डर देऊन २०२२मध्ये कंपनीने काम सुरू केले.
पाणीपुरवठा योजनेचा मुख्या गाभा असलेल्या जॅकवेलचे काम सन २०२४मध्ये सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ३८ किलोमीटर अंतराची २५०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. विविध अडथळ्यांची शर्यत पार करून जलवाहिनीसह आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात आली. पाणीपुरवठा योजना मंजूर
झाली, तेव्हा या योजनेची किंमत १,६८० कोटी रुपये होती. त्यानंतर ती २,७४० कोटी रुपयांवर पोहोचली. या पाणी पुरवठा योजनेची क्षमता ३९२ एमएलडी इतकी आहे.
शहरातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वीत करुन २०० एमएलडी पाणी शहरवासियांना देण्याचा निर्णय शासन व प्रशासनाने घेतला. त्यानुसार पुरक कामांना गती देत कामे पूर्ण करण्यात आली आणि २३ मार्चपासून मुख्य जलवाहिनीसह जॅकवेल, पंप आदींची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. ३८ किलोमीटर अंतराच्या मुख्य जलवाहिनीवर दर चार किलोमीटर अंतरावर बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि स्क्रोल व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. चार चार किलोमीटर अंतराची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने भरुन तिची चाचणी घेण्यात आली. चाचणीच्या दरम्यान तीन चार ठिकाणी व्हॉल्व्हच्या गळतीच्या, वेल्डिंग निखळण्याच्या घटना घडल्या. या सर्वांवर मात करीत अखेर मंगळवारी (१४ एप्रिल) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाणी दाखल झाले. त्यासाठी सकाळी साडेसात वाजता जायकवाडी किलोमीटरचा
पाणी घरात पोहोचण्यासाठी लागणार काही महिने
तांत्रिक कामे बाकी
44 सुमारे तासाभरानंतर जायकवाडी येथील पंप बंद करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला, जलवाहिनीत भरलेले पाणी पुन्हा जायकवाडीपर्यंत नेले जाणार आहे. पाणी माघारी नेताना जलवाहिनी पूर्णपणे स्वच्छ करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. सुमारे आठ ते दहा दिवस यासाठी लागतील. नक्षत्रवाडीच्या डोंगरावर बांधण्यात आलेल्या एमबीआर (संतुलित जलकुंभ) पासून शहराच्या विविध भागातील जलकुंभांना जोडण्यासाठी ११००, १५०० आणि २००० मिलीमीटर व्यासाच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनींची जोडणी, जलकुंभांसाठी जलवाहिनीची जोडणी आदी तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर एक ते दीड महिन्यांनी शहराला वाढीव पाणी मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
प्रवास सकाळी साडेसात ते दुपारी दोन साडेसहा तासांत पूर्ण केला.
नक्षत्रवाडी येथे बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकरण केंद्रात पाणी दाखल होणार असल्यामुळे पाण्याचे स्वागत करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे महापालिका व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू यांच्यासह अन्य कर्मचारी दुपारी बारा वाजेपासून उपस्थित होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास जलशुध्दीकरण केंद्रात पाणी दाखल झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी करून पाण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देण्यात आल्या. अमोल येडगे आणि मनीषा पलांडे यांनी जलपूजन केले.
Powered By Vradhes Solutions